मूळ उल्लासवरून उल्हास हा शब्द आला असला तरी आता दोन्ही रूपे मराठीत (व हिंदीतही) रूढ आहेत. किंबहुना मराठीत आता 'उल्हास' हाच अधिक प्रचलित दिसतो. सरदेसाई व मर्गज ह्यांच्या नवनीत मराठी-इंग्लिश-मराठी शब्दकोशात उल्लसित व उल्हसित अशी दोन्ही रूपे दिली आहेत. उल्लसितला त्यांनी "पाहा :  उल्हसित" असेच दिले आहे. 'उल्हासित' काही शब्दकोशात सापडला नाही, मात्र गूगलून पाहता अनेकांनी वापरला आहे असे दिसते. हा वापर शुद्ध की अशुद्ध हे वैय्याकरण्यांनी सांगावे.