माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:
दुसऱ्या रात्रीचे 'घोराख्यान' ऐकून झाल्यावर सकाळी जागे झालो तेंव्हा चांगलेच उजाडले होते. पण जाग आली होती ती छपरावर नाचणाऱ्या माकडांमुळे. १-२ नाही तर अख्खी टोळी होती त्यांची. आम्ही सर्व सामान पटापट आवरून घेतले आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. एकेकाची शेपटी ही.... मोठी. फोटो तर बघा काय सही आले आहेत त्यांचे. नाश्ता हादडला आणि निघणार तितक्यात गावातला एकजण आख्खी टोपली भरून सिताफळ विकण्यासाठी घेउन आला होता. त्याने ती टोपली खाली ठेवल्या-ठेवल्या आम्ही बोललो. 'कैसे दिया?' त्याची भाषा जरा राजस्थानी असल्याने काही शब्द आम्हाला कळले नाहीत. मग शिवसिंग ...