मोडके तोडके हिंदी बोलणाऱ्या/लिहिणाऱ्यांवर शुद्ध हिंदी लिहिणारे/बोलणारे लोक सहज कुरघोडी करू शकतात/करतात. हिंदी बोलण्याच्या बाबतीत ही
गोष्ट शंभर टक्के खरी आहे. जोपर्यंत उत्तम हिंदी बोलता येत नाही, तोपर्यंत हिंदीभाषक आपल्यावर कुरघोडी करणारच. हिंदी लिहिण्याची आपल्याला फ़ारशी गरज़ पडत नाही. आणि शिवाय, शुद्ध हिंदी लिहिणे तितकेसे अवघड नाही. तसे बोलण्याचे नाही, त्याला खूपच सवय लागते. असे असले तरी, हिंदीभाषक सोडले तर इतर सर्व समाजांचे हिंदी थोडेफ़ार मराठी लोकांसारखेच असते. त्यामुळे, त्यांच्यांमध्ये आणि आपल्यांत समानता निर्माण होण्यास कुठलाही प्रत्यवाय नाही. खरे तर, तर हे सर्वच भाषांना लागू आहे. मराठी बोलणाऱ्या मंडळीत एखादा मोडके तोडके मराठी बोलणारा तमिळभाषी वेगळा पडणारच.
इंग्रजीने भारतात समानता आणलीच आहे यात काहीच वाद नाही. आपण जर उत्तम इंग्रजी बोलू/लिहू शकलो, तर सर्व गैरइंग्लिश लोकांवर मात करणे आपल्याला सहज शक्य होईल. कुठलीही भाषा शिकायची ती पहिल्या दर्जाची, हे धोरण असले की कोणीही आपल्याला केवळ भाषिक कारणासाठी वरचढ नसेल, हे ध्यानी धरावे..--अद्वैतुल्लाखान