मस्त ओघवतें वर्णन. मनस्थिती पण छान रंगवली आहे. गोवा नाहीं तर संयोजकांनीं दक्षिण कोंकण दाखवायला हवा होता. मालवण, सिंधुदुर्ग, तेरेखोल, विजयदुर्ग, कुणकवळे, पंचवीसपेक्षां जास्त ठिकाणें निघतील. निसर्ग गोव्यासारखाच आहे. घरें संस्कृती वेगळी.
बहुधा भयामुळें संयोजकाना सुचलें नसावें. असो. हटके आठवणींचा लेख मात्र चांगला.
सुरंगीबरोबर शांतादुर्गेच्या देवळाबाहेर मस्त कर्मळें मिळतात. तशीं
कर्मळें खायला थेट मुंबईत मरीन लाईन्स स्टेशनबाहेरच यावें लागतें. सहसा मध्यें कुठें मिळत नाहींत. गोल्डफिश साबणहि कांहीं आठवणी ताज्या करून गेला.
सुधीर कांदळकर