... ३ जानेवारी २०१० ला अंनिस द्विदशकपुर्ती समारंभात पुण्यातील एसेम जोशी
सभागृहात प्रसार माध्यम हा विषय परिसंवादासाठी घेतला होता. संजय आवटे हे
तरुण पत्रकार सध्या पुढारीचे निवासी संपादक व सकाळ टाईम्स चे श्री आनंद
आगाशे हे पत्रकार यानिमित्ताने बोलत होते. प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रे व
दृकश्राव्य माध्यमे यांचे वेगाने बदलत जाणारे स्वरुप हा समाज बदलाशी
निगडीत आहे. पत्रकार हे त्यांचे प्रतिनिधि. पोलिस म्हटल्यावर तंबाखु खाउन
पचापचा थुंकणारा, ढेरपोट्या,चेहर्यावर ओतप्रोत बुद्धीमांद्य, पैशे
खाण्यासाठी सावज हेरणारा असा एक सरकारी माणुस असे नजरेसमोर येते. तसे
पत्रकार म्हटल्यावर आपल्याला शबनम झोळी खांद्यावर घेउन चाणाक्ष नजरेने
समाजाचे वास्तव टिपणारा एक वृत्तपत्राचा एक प्रतिनिधी असे डोळ्यासमोर
येते. आठवा सिंहासन मधला दिगु....
पुढे वाचा. : प्रसारमाध्यम स्वरुप, कारणे आणि उपाय