माझ्याही मनांत दुर्बीण घ्यायचें घोळत होतें. मध्यें लोकसत्तेंत मार्गदर्शन आलें होतें. पण तांत्रिक आणि त्रोटक. त्यांत व्यापारी माहिती नव्हती. वरदा आणि मंदारनें चांगली माहिती दिली आहे. तेजराजच्या स्थळावर बरीच व्यापारी माहिती आहे. विविध दुर्बिणींचे पॅरामीटर्स आणि किंमती देखील. त्यातले पॅरामीटर्स व किंमती आणि विशिष्ट उपयुक्तता एका कागदावर उतरवून घेतो. लोकसत्तेंत जास्त तांत्रिक माहिती दिली आहे. ती, किंमत आणि कागदावर उतरवलेली माहिती ताडून कोणती ह्यायची तें निश्चित करतां येईल.
सुधीर कांदळकर