हा संगणक ज्यास म्हणतात आत्मा, कसा द्यायचा फेकुनी?
टोचे दुराचार केला तरी वा सदाचार केला तरी
माझ्या देहात वसणारा आत्मा हा जणू देवाने इन्स्टॉल केलेला एक संगणक आहे. मी कसाही वागलो तरी तो ते देवाला कळवतो. ते कळवण्यासाठी त्यातूने जी स्पंदने निघतात ती मला टोचतात. माझ्या पाप पुण्याचा हिशोब करायचा असला तर करा, पण हे सततचे टोचणे कसे बंद होणार समजत नाही.
उतरेचना एकतर कालची आणि इच्छा उद्या प्यायची
हा वार केला तरी व्यर्थ जातो नि तो वार केला तरी
यात 'वार' य शब्दाचा अर्थ गुरुवार, शनिवार असे जे उपास केले जातात तसा आहे. मारामारीतील वार नव्हे.
समजा मी गुरुवार करत असलो तर एकतर मुळात बुधवारी घेतलेलीच अजून उतरलेली नसते अन कधी एकदा शुक्रवार येतो अन मी पुन्हा 'घ्यायला' जातो ही इच्छा मनात असते. मग त्या गुरुवार करण्याचे काय पुण्य मिळणार? (थोडक्यात, वरवर चांगले वागून उपयोग नसतो तर मन चांगले असावे लागते).
अजून काही शंका किंवा प्रश्न पडत असल्यास जरूर विचारा. निरसन करण्यात मला आनंद वाटेल.
धन्यवाद!