पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
साहित्य प्रकारात कविता या प्रकाराला विशेष महत्व आहे. कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकाराबरोबरच कविता हा प्रकारही लोकप्रिय आहे. कवितेलाच संगीत दिल्याने अनेक चांगल्या कवितांची सुमधुर आणि अजरामर अशी गाणी तयार झाली आहेत. मराठीत तर ही काव्यपरंपरा खूप मोठी आहे. कथा किंवा कादंबऱ्यांच्या तुलनेत मराठी काव्यसंग्रहाला फारसा खप नसला तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अन्य कोणत्याही साहित्यविषयक कार्यक्रमात नवोदित आणि मान्यवरांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम हा असतोच आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ...