पैशासंदर्भातील तंटे मुलांसमोर टाळावेत हे विक्रम जाधव ह्यांचे म्हणणे एकदम पटले! सर्वसाधारणपणेच मुलांसमोर भांडणे टाळावीत. पालकांना भांडायचे असेल तर मुलांना बाहेर खेळायला पाठवून किंवा पालकांनी बाहेर जाऊन मुलांच्या अपरोक्ष भरपूर, मनसोक्त भांडून घ्यावे. मुलांना त्याची धग नको. जर मुलांसमोर भांडणे झाली तर त्यात मुलांचा काहीही दोष नाही हे त्यांना समजावून सांगावे. तसेच संसारात भांडणे, तंटे ही सर्वसामान्य, किरकोळ बाब आहे हे त्यांना समजले तर तेही एका परीने चांगलेच म्हणावे लागेल! त्यामुळे त्याचे अवास्तव टेन्शन मुले घेणार नाहीत.
मुलांच्या परीक्षांच्या अगोदर आणि परीक्षाकाळात पालकांनी संयम बाळगून अशी भांडणे, गृहकलह यामुळे घरातील शांतता विचलित होणार नाही ह्याची काळजी घेणेही आवश्यक आहे.