वरील सर्व मतांशी मी तत्त्वतः सहमत आहे.
मात्र, आणखीही एक मुद्दा, या कायद्यासंदर्भात महत्त्वाचा आहे.
आईवडील मुलीच्या लग्नात कित्येकदा, दोन्हीकडचा लग्नखर्च, मानपान-आहेर, हुंडा, घरभरणी या स्वरूपात तिला आपल्या संचितातला मोठा हिस्सा देतच असतात. त्याचा विचार केल्यास त्यांच्या एकूण संपत्तीतून, त्यांच्यापश्चात मुलीला मिळण्यासारखा हिस्सा क्वचितच उरतो. एवढेच काय, मुलीच्या लग्नाखातर झालेले कर्जच मुलाला फेडण्याकरता मागे राहते. अशा प्रसंगी मुलीने (व तिच्या सासरच्यांनी) उदार मनाने, तिच्या भावाला मिळणाऱ्या संपत्तीत वाटा मागणे टाळावे, असे मला वाटते. अशा प्रसंगी त्यांनी अव्यवहार्य ठरणाऱ्या कायद्याचा चमत्कारिक बडगा वापरणे टाळावे.