पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
परीक्षेत पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या, कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या, रॅगिंगला कंटाळून आत्महत्या, नोकरी मिळाली नाही म्हणून आत्महत्या... अशा घटना अलीकडे वाढल्या आहेत. काही तरी अपेक्षा ठेवून जीवनाची सुरवात करण्यासाठी निघालेली ही मंडळी पहिल्याच अपशयाने खचून जाऊन जीवनच संपवितात. जीवनाकडे सर्वांगीण दृष्टीने पाहण्याची समजही न आलेले हे जीव फुटकळ कारणांसाठी "आता सारे संपले,' असा समज करून आत्महत्या करतात. हे प्रकार रोखण्यासाठी केवळ कायदे अगर चर्चा करून भागणार नाही. जे पालक आणि समाजव्यवस्थेने या विद्यार्थ्यांच्या शिरावर अवास्तव अपेक्षांचे ओझे ...