स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या रविवारी सकाळी-सकाळी पेपर वाल्याने बेल वाजवून बिलाची वर्दी दिली. आदल्याच रात्री सिनेमाला गेलो होतो, त्याच धुंदीत सिनेमातली लावणी अजून जिभेवरुन (आणि हीरॉईन डोक्यातून) उतरायला तयार नव्हती. त्याने माझ्याच समोर बिल लिहिले. प्रत्येकाचे हिशेब कसे काय लक्षात ठेवतो देव जाणे. कदाचित महिन्याच्या महिन्याला घरच्यांकडे पाहून बिल लिहीत असावा कारण मी आज खुश आहे म्ह्टल्यावर दर महिन्यापेक्षा १० रुपयाने बिल वाढले होते. माझी गुणगुण ऐकून माना वगैरे डोलवत होता. त्याच्या श्रवणभक्तीत खंड नको ...