सर्वांना प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! प्रतिसादांमुळे मुठभर मांस चढले.

मला मनोगत व सुरेश भट या दोन संकेतस्थळांच्या तांत्रिक बांधणीत काही फायदे तोटे आढळले या गझलेच्या निमित्ताने.

१. सुरेश भट डॉट इन वर गझलेला प्रतिसाद दिला तर ती गझल यादीत सर्वात वर येते व त्यामुळे वाचली (बिंग रेड, नॉट बिंग सेव्हड, हा हा) जाण्याची शक्यता जास्त असते. मात्र त्यामुळेच 'इतर गझलांना / लेखांना' प्रतिसाद आले तर ती मागेही जाते. माझी हीच गझल त्या स्थळावर पहिल्या पानाच्या तळाशी प्रकाशित झाली. इतर गझलांना आलेल्या प्रतिसादांमुळे ती लगेचच दुसऱ्या पृष्ठावर गेली. आता ती विस्मरणातही गेली असेल. (खरे तर माझ्याही )

२. मनोगतवर जर आपल्या कवितेवर / लेखांवर काही दिवसांनी प्रतिसाद आले तर ते मागच्या पानांवर जाऊन पाहत बसावे लागतात. ती कविता / लेख वर सरकत नाही. मात्र मनोगतवर प्रकाशित होताना मात्र साहित्य सर्वात वर असते त्यामुळे ते डोळ्यासमोर राहण्याची शक्यता असते.

अर्थात, हा प्रतिसाद मी सुरेश भट या स्थळावरही द्यायला हवा आहे. पण बरेच वाचक कॉमन असल्यामुळे व माझ्या या गझलेला येथे प्रतिसाद आल्यामुळे येथे देत आहे.

पुन्हा आभार!