चांगली गझल वैभव! बरेच दिवसांनी आली त्यामुळे वेगळाच आनंद झाला.

एक इरादा हसण्याचा अन विरोधात दुनिया सारी
आणि नभाषी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी - इतक्या छोट्या - वा!

आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा? 
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी? - लक्षात आला नाही.

काय कुणाचा खजिना माझ्या उरामध्ये दडला आहे - (उराम'धे'?)
एक आठवण "तिळा तिळा" घोकते पापण्यांच्या दारी - वा वा! फारच सुंदर शेर!

दोन अपत्ये पोटाला अन  जन्मभराचे फरपटणे - सुंदर!
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी

काळ असा आहे की रात्री भिंत भिंत दचकत असते
कसे कळेना सगळे झाले अतिरेक्यांचे शेजारी

परवा परवा गुणगुणायची.. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी  - व्वा!

कुठल्याशा आजाराने तोंडाची चव गेली आहे
शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी - सुंदर शेर!

एक इरादा निघण्याचा अन विरोधात ह्या दिशा दिशा
पाय ठेवतो ज्यावर त्या त्या वाटा फिरती माघारी - त्या त्या वाटा फिरती माघारी! सुरेख!

धन्यवाद!