निरागसतेंचें मस्त वर्णन.
कुशाग्रसाहेब धन्यवाद. मींही हा किस्सा पुढे ढकलून आलेल्या विरोपांत वाचला होता.
यावरून आठवलें. पुण्यावरून महाबळेशरला जातांना पांचगणीच्या अलीकडेपलीकडे शेरबाग म्हणून एक मस्त ठिकाण आहे. या बागेंत प्रवेश शुल्क आहे. पण अतिशय नयनरम्य अशी बाग आहे. इथें ठिकठिकाणीं इंग्रजी सुभषितांचे वा सुविचारांचे फलक आहेत. पण बहुतांशीं मोठ्यांसाठीं त्यापैकीं एक असा आहेः आपल्या पायांत बूट नाहींत म्हणून दुःख करूं नका. बूट घालायला पाय आहेत यांत आनंद माना.
सुधीर कांदळकर