पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
सरकारी पगार घेऊनही कामासाठी जनतेकडून लाच घेताना विविध खात्यांतील अधिकारी-कर्मचारी पकडले जाण्याच्या घटना नेहमी घडतात; पण लाचलुचपतीत बहुतांश लोकप्रतिनिधीही मागे नाहीत. त्यांना पकडून देण्याचे आणि पकडण्याचे प्रमाण कमीच आहे. नगरमध्ये गेल्या आठवड्यात असेच एका घटनेत ग्रामसेवकाबरोबरच सरंपचालाही पकडण्यात आले आहे. अलीकडच्या काळातील ही जरा वेगळी घटना असल्याने लोकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. नगर तालुक्यातील पारेवाडी येथील हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, दारिद्य्ररेषेखालील व्यक्तीकडून लाच घेतली गेल्याचा आरोप आहे. सरपंच आणि ग्रामसेवक दोघेही एकाच वेळी ...