पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मुंबई कोणाची या विषयावरुन सध्या राजकीय गदारोळ सुरु आहे. मुंबई सर्वांची की मुंबई मराठी माणसांची असा वादाचा विषय आहे. भाषिक प्रांत रचनेनुसार राज्यांची निर्मिती झाल्यानंतर मराठी माणसांचे महाराष्ट्र हे राज्य निर्माण झाले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग मुंबईत मराठी माणसांचे, मराठी भाषेचे वर्चस्व असले किंवा मराठीला प्राधान्य दिले गेले तर इतरांच्या पोटात का दुखते. अन्य भाषिक राज्ये (तामिळनाडु, कर्नाटक) आणि तेथील नेते आपल्या भाषेबद्दल जितका अभिमान की दुराग्रह बाळगतात, तेवढा मराठी माणसे बाळगत नाही ...