खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
खुप-खुप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. बहुदा १९९१-९२. मी इयत्ता तिसरी-चौथीमध्ये असीन. (म्हणजे काय.. शाळेत गेलो होतो मी लहानपणी.!!!) उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व केळव्याला म्हणजे माझ्या गावाला गेलो होतो. किंबहुना सुट्टीमध्ये तेच काम असायचे. एकदा का शाळा संपली की गावाला जायचे वेध लागायचे. मग काय खाण्याची चंगळ असायची... असो आज विषय फ़क्त भात आहे तेंव्हा त्याच्याबद्दलच ...