झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याला नवीनच रहायला आलो होतो तेंव्हाची गोष्ट. सोसायटीमध्ये आमची बिल्डिंग कोपऱ्याला होती ... त्यात आमचा मागच्या बाजूचा फ्लॅट.एका बाजूला ऊसाचं शेत आणि दुसरीकडे कालवा आणि त्याच्या बाजूची झाडी, पेरूची बाग असा ‘व्ह्यू’ मिळायचा खिडक्यांमधून. सगळीकडे हिरवंगार. आमच्यासारखेच ही हिरवाई ऍप्रिशिएट करणारे बरेच पाहुणेही यायचे घरी. मुख्यतः उंदीर. शेतातलं खाणं संपलं, की ते आमच्याकडे यायचे. एक दिवस तर आजी रात्री झोपलेली असताना तिच्या बोटाला उंदीर चावला! तर उंदरांचा बंदोबस्त हा एक आवश्यक कार्यक्रम झाला.