आनन्द येथे हे वाचायला मिळाले:
"अरे, जरा पुढे हो, मला त्या नवरीनं नेसलेली साडी पहायची आहे, पिवळ्या रंगाला जांभळे काठ असलेली", माझी बायको मला पुढे ढकलत होती. एका लग्नात आम्ही अगदी ऐन मुहुर्ताला पोचलो होतो. त्यामुळे कार्यालयाच्या दारातून अनेक जणांच्या खांद्यांवरून लांब व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधुवरांना, टाचा उंचावून पाहण्याचा प्रयत्न चालू होता. पुढे मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. माणसं दाटीवाटीनं माणसं उभी होती.