उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

या वेळेची उन्हाळ्याची सुट्टी मी कोल्हापुरात आणि पुण्यात घालवली. अज्जी नसेल ही कल्पना होती, पण ती नसल्यामुळेच कदाचित तिचं अस्तित्त्व अजूनच जाणवलं. तिच्या रिकाम्या खोलीत मला माझ्यातली नुकतीच रिकामी झालेली जागा दिसली. तिच्या कपाटावर आजोबांच्या रेल्वे पासची तारीख तिने खडूने लिहून ठेवली होती. ती गेल्यानंतर असंख्य न पुसता येणा-या आठवणींमध्ये ते मोत्यासारखं टपोरं अक्षरही सामील झालं आहे. ते बघून वाटलं, या अक्षरांभोवती लोखंडी कुंपण घालावं, कारण हे काढणारे साय-भाती हात आता कधीच परत येणार नाहीत. तिनं माझ्यासाठी ...
पुढे वाचा. : सुरवंट