माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:
मला लहानपणापासून डोंगरांची नितांत आवड. त्यांच्याकडे जायची सुप्त इच्छा सतत मनात येत असे. डोंगरात जावे आणि निसर्ग भर-भरून पहावा असे सारखे वाटायचे. त्यामुळे ट्रेकला जाण्याची इच्छा निर्माण झाली. टेंटमध्ये रहायचे, ब्लैंकेट घेउन झोपायचे आणि आकाशात बघत तारे मोजायचे... काय मस्त ना... आयुष्यातले सर्वात सुखद क्षण हे.. नाही का ... !!! अशी संधी मला मिळाली ती 2000 साली. एक असा अनुभव जो मला देऊन गेला आयुष्यभरासाठी थरारक अनुभव, कधी न विसरता येतील अश्या आठवणी आणि मित्र-मैत्रिणीं. माझा भाऊ हिमांशुने मला या ट्रेकबद्दल जेंव्हा सांगितले तेंव्हा मी लगेच तयार ...