तुम्ही खूप विचारपूर्वक लिहिलंय..... मला एका झटक्यात हा लेख वाचून संपवता आला नाही. तो पुन्हा पुन्हा वाचून त्यावर चिंतन, मंथन करावे लागेल. इतके चांगले विचार समोर आणत आहात त्याबद्दल आभार! मराठी माध्यमातील गणिताला मराठीतून आकडे लिहिले जायला हवेत हे खरं आहे.
तुम्ही सांगितलेल्या ७ कौशल्यांतच श्रममूल्याला पुनरुज्जीवित करणारी कौशल्ये असावीत. परंतु त्यांचा वेगळा उल्लेख आपल्या लेखात मिळाला नाही. त्यांनाही शिक्षणात अग्रांकित स्थान हवे. पूरक अभ्यासक्रमांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना शेती, हवामान व पूरक व्यवसायांचे ज्ञान हवे.
तसेच प्रौढ निरक्षरांना किंवा कमी शिकलेल्यांना व्यापक पातळीवर सरकारमान्य व्यवसायाभिमुख अल्पकालीन पदवी/ पदविका अभ्यासक्रम हवेत, ज्यातून त्यांना मार्गदर्शन व ज्ञान तर मिळेलच, शिवाय रोजगार-कमाईला हातभार लागेल. त्यांत प्रॅक्टिकल्सवर भर असेल व त्या क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती, तंत्रज्ञान याविषयी ते शिकू शकतील. त्यासाठी अभ्यासक्रम त्यांना अनुकूल वेळ कोणती यावर बेतलेले असावेत.