गुरुकुल व संस्कृतीसाधन हे दोन शब्द तुम्ही वापरले आहेत. या दोन शब्दांवरून व त्यावरील विवेचनावरून आठवण झाली.  तुम्ही जर स्वामी सवितानंद यांचे मंत्र स्तोत्रांचे महत्त्व हे पुस्तक वाचले नसले तर जरूर वाचा. स्वामींनी खास करून हल्लीच्या तरुण पिढीसाठी लिहिले आहे. इतकेच नव्हे तर तरुण पिढीला ते आवडलेले आहे. ३ वर्षात तिसरी आवृत्ती निघाली आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत (कै.य गो जोशी यांचे) प्रसाद प्रकाशन, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे ३०. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी असावी.