आणखीही खूप विचार या विषयावर होण्याची गरज आहे! आपणही आपल्या मौलिक विचारांना इथे नक्कीच व्यक्त करू शकता.
आपण म्हणता त्याप्रमाणे, नीतिमूल्ये (ज्यात श्रमाचे मूल्यही समाविष्ट आहे), संस्कृतीसंवर्धन, परंपरागत चालीरीती आणि धर्मविचारांच्या औपचारिक शिक्षणाचीही आवश्यकता असतेच. मात्र शालेय शिक्षणादरम्यान त्याचा किती प्रमाणात अंतर्भाव करावा यावरही साधकबाधक विचार व्हायला हवा आहे. लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याआधी, या साऱ्या आवश्यकतांना प्राथमिकता मिळायला हवी आहे.
व्यावसायिक शिक्षण हल्ली शालांत शिक्षणोत्तरच संकल्पित असल्याने मी ते विचारात घेतलेले नव्हते. मात्र शालेय शिक्षणातही त्याचा विचार व्हायला हवा हे आपले म्हणणेही रास्तच आहे. कधी आणि कसा हे विचारपूर्वक ठरवायला हवे.
गंभीर स्वरूपाच्या लेखाचे आवर्जून वाचन, मनन करून आपले विचार इथे व्यक्त केल्याखातर मन:पूर्वक धन्यवाद.