उत्खनन! उत्खनन!!

टमाटोचं उगमस्थान परकीय भूमीत; त्यामुळे देशी प्रतिशब्द मिळणे कठीण. पण विदर्भात बिंग्रे किंवा भिंद्रे असे काहीसे म्हणतात असे पुसटसे आठवते. त्याच्या तांबड्या रंगावरून  तांबडका, तांबडुला, तांबका असे शब्द रूढ करता येतील. मूळ शब्दाशी ध्वनिसाधर्म्यही राहील. 'रक्त'  शब्दानेही लाल रंग व्यक्त होतो. उदा. रतांबा/रातांबा=रक्त+आम्र. राते भात=रक्त(वर्णी) भात अर्थात पटणीचे भात.