म्हणजे काय? तर पहिल्या प्रसंगातील बाबा आणि दुसऱ्या प्रसंगातलीं मुलें. प्रसंग कथेतले नसून खरे असावेत. आअपल्या संवेदनशीलतेला कुर्निसात. अशी संवेदनशीलता क्वचितच आढळते. ओघवत्या शैलीतले मनाला भिडणारे प्रसंग छान वर्णन केले आहेतल. आवडलें.

यावरून आठवलें. आमचा चि. आतां मोठा होऊन नोकरीही करतो. पण तो त्याचा खाऊ घरांतल्या सर्वांना दिल्याशिवाय कधीं खात नसे. चॉकलेट वगैरे तर आधी मी, त्याची आई, घरांत माझी आई, भाऊ, बहीण वगैरे जे कोण आलें असेल तर त्यांनाही एकेक तुकडा भरवून मगच आपण खात असे.

एक प्रसंग तर माझ्या मनावर कोरला आहे. तेव्हां आम्हीं भाईंदरला राहात असूं. नेहमीप्रमाणें संध्याकाळीं साडेसहाला घरीं आलों. तर चिरंजीव एकटाच गुपचूप बसला होता. चेहरा रडवेला. आई ओरडली पण नाहीं म्हणाला. फेरीवाले भरपूर येत. आमच्या सौ ने त्या दिवशीं दुपारीं एक मातीचीं रंगानें मस्त नक्षीकाम केलेलीं अडीच तीन फूट उंच मातीची (टेराकोटा) फुलदाणी दरवाजात फेरीवालीकडून विकत घेतली. मुलाचा खेळतांना धक्का लागून ती घेतल्यावर दोनेक तासांतच फुटली. त्यामुळें त्याला वाईट वाटलें होतें. मग त्याला समजावलें कीं खेळणें हा मुलांचा हक्क आहे. फुलदाणी दुसरी घेतां येईल पण खेळायचें वय मात्र परत येणार नाहीं आणि आईसक्रीम आणले तेव्हां त्याची कळी खुलली.

सुधीर कांदळकर