पण आकडे लिहिण्यासाठी लिपी मात्र जागतिक स्तरावर सर्व भाषांत समान असावेत. मागें दोन विमानांची हरियाणावरील आकाशांत टक्कर झाली होती ती रशियन कीं ताजिकी कीं अशाच कोणीतरी विमानचालकाला रेडिओटेलिफोनीक संकेत न कळल्यामुळें झाला होता.


तरीही आजच्या पद्धतीमध्ये इंग्रजी व गणित या विषयांमध्ये, शालांत परीक्षा अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ५०% एवढी राहत आलेली आहे

हें अगदीं खरें. यांत गरीब आणि ग्रामीण विद्यार्थीच बहुधा असावेत. तेव्हां विषयांची सक्ती नसावी या मताशीं सहमत.

आपल्या शिक्षणपद्धतीचें स्वातंत्र्यानंतर प्रथम नियोजन केलें तेव्हां आपण उद्धृत केलेली माहिती उपलब्ध नसावी. तसेंच या शिक्षणपद्धतीच्या त्रूटींही आतां दीर्घ अनुभवानेंच जाणवल्या आहेत तेव्हां मुळातूनच पद्धती पुन्हां नियोजित करवी लागेल हें पटलें.

सुंदर. सखोल अभ्यास करून लिहिलेला विचारप्रवर्तक लेख.

सुधीर कांदळकर