एका चांगल्या विषयावर ऊहापोह चालू आहे . शिकवणी घेण्याच्या निमित्ताने माझा बऱ्याच शाळकरी विद्यार्थ्यांशी संबंध येतो. त्यांचे समुपदेशन करताना श्री. नरेंद्र गोळे यानी लिहिलेले बरेच विचार अमलात आणावे लागतात. मुख्य म्हणजे विषयाची गोडी मुलाना कशी लागेल आणि अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती ,ही कशी सोपी आहे याची मनसिक तयारी मुलांची आधी तयार करून घ्यावी लागते. शिक्षणाच्या आईचा.... हा चित्रपट बघण्यात आला. शाळा, शिक्षण, अभ्यास ,परीक्षा ह्या टप्प्यावर अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या कशा कमी होतील याचा विचार व्हावा हाच वरील लेखाचा उद्देश आहे. खालील विचार कृतीत आणला गेला तर फरक पडू शकेल असे मला वाटते.
शालेय शिक्षणातील महत्त्वाचा दुवा शिक्षक . त्या प्रत्येक विषयातील शिक्षकांचे त्या त्या विषयाचे ज्ञान किती अद्ययावत आहे, याची चाचणी घेण्याची सोय हवी. शिक्षकांचे पगार वाढतात पण त्याना त्या विषयासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासात काहीच वाढ करावयाची गरज भासत नाही. त्यंच्यापाशी मुलाना शिकवणे या मुख्य कामासाठीच अल्प वेळ असतो. मुलांची संख्या जास्त. हे काळ काम वेगाचे गणित इथे सतत चुकते. मुले ज्या परीक्षा देतात त्या शिक्षकानीही द्याव्यात विशेषतः १० वी १२वी . त्यातले त्यांचे गुणांकन नोंद होण्याची सोय व्हावी.चांगले शिक्षक तयार झाले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा काळ सुखाचा होईल.
पालकांनीही अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता मुलांना समजून घेतले तर ही प्रक्रिया सहज होऊन जाते.