आमच्या स्वयंपाकीणबाई तांबाटी म्हणायच्या. अस्सल मराठी शब्द आहेत बेलवांगे/भेदरे. टमाटा/टामाटा हेही अधिकृत शब्द आहेत. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या एका वनस्पतिशास्त्राच्या पुस्तकात लिहिले आहे की, 'टमाटा हे फळभाजीचे वानस गेल्या पन्‍नास वर्षांत फार प्रसिद्धी पावले आहे. यास त्यापूर्वी बेलवांगे म्हणत. ... हे मूळचे दक्षिण अमेरिकेतले आहे. ते सतराव्या शतकात प्रवासी लोकांनी आणून रूढ केले आहे. वगैरे. त्याची शास्त्रीय नावे आहेत लायकोपर्सिकम एस्क्युलेन्टम, लायकोपर्सिकॉन लायकोपर्सिकम आणि सोलॅनम लायकोपर्सिकम..याला हिंदीत  टमाटर म्हणतात..'
महाराष्ट्र सरकारच्या दार्शनिकेत(गॅझेटियरमध्ये) याचे नाव टामाटा दिले आहे. तिथेच हिंदीतले आणखे एक नाब दिले आहे--बेल बैंगन.
विदर्भात काय म्हणतात ते माहीत नाही, पण पश्चि‌म महाराष्ट्राच्या काही भागांत टॉमॅटोला भेदरे म्हणतात. ही सर्व मराठी नावे कुठे ना कुठे रूढ आहेत आणि सररास वापरली जातात..