दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:


शाळेत असतानाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मराठीच्या पुस्तकातल्या कविता….आणि सगळ्यात नावडती गोष्ट म्हणजे त्या कवितांचे व्याकरण…वृत्ते. कवितांना चाली लावून म्हणायला मजा यायची पण त्याच चालींमागचा आधारस्तंभ असलेली वृत्ते नकोशी वाटायची…सगळे गण पाठ करून वर कोणते वृत्त आहे ते शोधा म्हणजे कटकटच होती….त्याच वृत्तांविषयी नंतर नंतर आत्मीयता वाटायला लागली. कवितेची चाल ही कवितेचा अर्थ पाहून ठरवावी लागते. तेच रसपरीपोषाला साजेसे असते. नाहीतरी गम्मत होते. ‘झाले युवतिमना दारूणरण’ सारखे प्रेमगीत संग्रामगीत वाटायला वेळ लागत नाही….आणि चाल कुठून येते? ...
पुढे वाचा. : वृत्ते – कवितेला जखडणारी की बांधणारी..?