भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:


एक दिवस रात्री ९ वाजता बाहेर फाटक वाजले, मी घरातुनच आवाज दिला. बाबानी दार उघड मी आहे असं म्हटल्यावर अगदी धावत धावत जाऊन दार उघडलो. त्या दिवशी बाबा आठवडी बाजारातुन खरेदी करण्यासाठी एटापल्लीला गेले होते. घरचा कुणी माणुस हाटाला गेला कि घरातिल बच्चा कंपनी त्याची आतुरतेने वाट पाहात असते. कारण हाटाला गेलेली माणसं आमच्या साठी खाऊ आणायचे. आज बाबांची पण मी खुप वाट बघत होतो. आमच्याकडे आंगणात एक बादली व पाणी ठेवलेलं असतं, बाहेरुन आलेल्यानी तिथे पाय धुवुन घरात यायचं असतं. बाबा पाय धुत असताना मी त्यांच्या हातुन पिशवी घेतली व धावत धावत घरात शिरलो. ...
पुढे वाचा. : कारमपल्ली-१