Prasad's (普拉萨德) Blogger येथे हे वाचायला मिळाले:
.. सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्णानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली ...