भारतात वाढणारऱ्या चेरीच्या इतक्या प्रजाती आहेत की लेखकाला कुठली चेरी हवी आहे ते समजले नाही. (१)गोड चेरी किंवा मझार्ड(प्रुनस ऍव्हियम), जंगली हिमालयीन चेरी(प्रुनस सेरासॉइड्स/प्रुनस पुडम)), आंबट चेरी किंवा बुटकी चेरी(प्रुनस सेरॅसस), हिमालयीन बर्ड चेरी(प्रुनस कॉर्न्यूटा), चेरी लॉरेल(प्रुनस लॉरॉसेरॅसस), महलेब चेरी(प्रुनस महलेब), युरोपीय बर्ड चेरी(प्रुनस पॅडस) वगैरे वगैरे. या सर्व चेरी, फळझाडे असून भारतात थंड हवेच्या ठिकाणी वाढू शकतात. परंतु, यांतली कुठलीच चेरी साकुरा म्हणून ओळखली जात नाही. जपानी प्रजाती पूर्णपणे भिन्न आहेत.
--अद्वैतुल्लाखान