एच. पी गॅसची जोडणी वेळेत न मिळाल्यामूळे मी संबधीत गॅस वितरकाकडे विचारणी केली असता, तूमचे कनेक्शन रद्द केल्याचे उर्मटपणे सांगतांना त्याचा (गॅस वितरकाचा..? गुंड वाचा)चेहरा लाल झाल्याचा जाणवला, मी त्याकडे दुर्लक्ष करून 'तुम्ही असं करू शकत नाही म्हटल्यावर मात्र त्याची तगमग, भडास मोकळी झाली. तो म्हणाला मला काय करायचे ते मी केले, तूम्ही पण काय करायचे ते करा, जावा इथून फुका तिकडं....दुसरीकडून घ्या. (मध्यंतरी एस. एम एस करायच्या ठीकाणी एस. एम. एस करून झाला पण त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता.) मी नुकताच भारत गॅस घेवून चरफडत मोकळा झालोय... अपमान गिळून.