कांदळकरसाहेब, प्रतिसादाखातर धन्यवाद!

इंग्रजी शिकू नये हा प्रस्ताव नाही, शुद्ध मराठीचा पर्याय हवाय!

आंतरराष्ट्रीय संबंधात इंग्रजी आकडे सर्वांना सहजसाध्य असू शकतीलही.
मात्र ज्याला केवळ स्थानिक स्तरावर आपली उपजीविका साधायची आहे अशा असंख्यांना त्याचा काय उपयोग.
पण मराठीत गणित शिकतांना, इंग्रजीत आकडे लिहीण्याचा जाच किती गोंधळांना जन्म देतो ह्याची कदाचित आपल्याला कल्पनाच नसावी. यातून दोन्हीही भाषेतील आकड्यांची सरमिसळ होऊन कित्येकांना नुकसान सोसावे लागते तेच कदाचित अशा धेडगुजरी पद्धतीचा अधिक चांगला निषेध करू शकतील. प्रखर धिक्कार करू चाहतील.

असो. आता आंतरराष्ट्रीय संबंधात एकच आकडे स्वीकारण्याचा प्रश्न. एकाच प्रकारचे आकडे सगळ्या जगाने वापरावे हे मला मान्यच आहे. मात्र ते आकडे देवनागरीच असावेत असे मला वाटते. भारतातील गणितज्ञांनी जगाला शून्य दिलेले असल्याने आंतरराष्ट्रीय दशांश पद्धतीत भारतीय -देवनागरी- आकडेच वापरावेत असा माझा प्रस्ताव आहे. हा दावा सशक्त असून कुठलाही प्रतिदावा त्यासारखा सशक्त असणार नाही आहे. त्याला किमान तुमच्यासारख्या मराठी माणसाने सर्वात आधी पाठींबा जाहीर करावा!