मी दोन वेळा गोल्डन टेंपल मेलने ए. सी. डब्यातून प्रवास केला आहे. पण माझा अनुभव मात्र चांगला आहे.
* जेवण काही अगदीच टाकून देण्याइतपत वाईट नव्हतं.
* रात्री एक माणुस सतत ए. सी. चेक करत होता आणि जेव्हा गरज असेल त्यानुसार तापमान कमी-जास्त करत होता.
* ज्या चादरी, रजया आणि उश्या देण्यात आल्या होत्या त्या स्व्च्छ होत्या.
* स्व्च्छताग्रुहेदेखिल वेळो-वेळी साफ करण्यात येत होती. प्रथमच रतलाम स्टेशनवर Eureka Forbes वाले येऊन व्यवस्थित फिनेलने गाडी स्वच्छ करुन जातात. (दोन्ही वेळचा अनुभव). अश्या २-३ मोठ्या स्टेशनांवर प्र्त्येक गाडी स्व्च्छ केली जाते. जम्मु-तावी मेल मध्ये तर आमचा साधा डबा होता, तरी देखिल साफ केला होता.
<< दिल्ली असो की हज्रत निजमुद्दिन स्टेशन, देशाच्या राजधानीचे स्टेशन म्हणताना सुद्धा लाज वाटत होती.>> १००% सहमत.
<<तुम्हाला सुद्धा नम्र विनंती, शक्य तेव्हा तुम्ही सुद्धा नियमांचं पालन करा.
"कोई देश बेहतर नही होता, उसे बेहतर बनाना पडता है! ">> १००% सहमत.
परिजा.....