-"मुद्दम वॉर्म अप याचे शब्दशः भाषांतर करण्याची मला जरूर वाटत नाही."
कसं बोललात!
मला तर बऱ्याच शब्दांबद्दल असे वाटते.
सीडी, डीव्हीडी, व्हिसीआर् , मोबाईल ... अजुनही आहेत!
कॉर्डलेस् चे शब्दांतर/टंकांतर बिनतारी होऊ शकते आणि वायरलेस् चे सुद्धा.
जसे चित्रपटाचे तिकीट म्हणजे प्रवेशिका असते, तर निवडणूकीचे तिकीट म्हणजे उमेदवारी असते.
जसे संगणकाच्या माऊस साठी मूषक वापरणे म्हणजे अट्टाहास आहे असे वाटते. मूळ अर्थाशी काहीही संबंध नाही! इट् इज् अ पॉईंटींग डिव्हाईस्. मूषक पेक्षा "निदर्शक" मूळ अर्थाच्या जास्ती जवळचा वाटतो. अर्थात झेंडे-फलक घेऊन निदर्शने करणारे पण "निदर्शक"च असतात. (चित्रपटाचा मराठीत "दिग्दर्शक" असतो, तर हिंदीत "निर्देशक".)पण एकाच शब्दाचे एकापेक्षा जास्ती अर्थ असणे मराठी भाषेला नवीन नाही.
नुसते शब्दांतर किंवा टंकांतर न करता शब्दाच्या आशयावर लक्ष केंद्रीत केले तर खरेच चांगले शब्द बनू शकतील. नाहीतर ओ-ला-ठो आणि प्राची-ला-गच्ची होईल, अजून काही नाही!