पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडीराज ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) तयार केला आणि तिथेच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला गेला. आज भारतीय चित्रपट सृष्टी/उद्योगात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब यांनी रोवली. त्यांनी निर्माण केलेल्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर त्यांना लंडन येथे राहून तेथे चित्रपट निर्मिती करावी, असे तेथील लोकांनी सुचवले होते. मात्र मी येथे राहिलो तर भारतात, माझ्या मायदेशात या उद्योग कसा फोफावेल, ...