पण मराठीत गणित शिकतांना, इंग्रजीत आकडे लिहीण्याचा जाच किती गोंधळांना जन्म देतो ह्याची कदाचित आपल्याला कल्पनाच नसावी.
नुकसान-गोंधळ झाला तरी चालेल, ते नुकसान सवडीने भरून काढता येईल..पण ललित साहित्य व धार्मिक साहित्य सोडले तर, इतरत्र सर्व प्रकारच्या स्थानिक व्यवहारांत, देशांतर्गत आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र हिंदू आकडेच वापरावेत.
देवनागरी अशा नावाचे आकडे नाहीत. आकडे आहेत ते हिंदू, मराठी, रोमन, हिंदी, गुजराथी वगैरे. हिंदी आणि रोमन आकडे केव्हा बंद झाले. हिंदी वाङ्मयात आता मराठी आकडे दिसतात किंवा हिंदू. इंग्रजी भाषेतही वेगळे आकडे नाहीत. ते हिंदू आकडेच वापरतात आणि ते त्यांना(अरबस्थानामार्फ़त मिळाले, म्हणून) अरबी आकडे म्हणतात.
ज्यांना घड्याळांच्या, फोनच्या तबकड्यांवरचे किंवा कळफलकांवरचे हिंदू आकडे समजतात त्यांचा गणितात तसले आकडे वापरण्याची सक्ती केल्याने कसलाही गोंधळ होण्याची शक्यता नाही. आणि झाला तर होऊ द्यावा, घड्याळ न समजणाऱ्यांना तेवढी शिक्षा हवीच.