शिक्षकांचे पगार वाढतात पण त्याना त्या विषयासाठी कराव्या लागणार्या
अभ्यासात काहीच वाढ करावयाची गरज भासत नाही.
कामगारांचे पगार वाढतात, बँक कर्मचाऱ्यांचे वाढतात, सरकारी नोकरांचे वाढतात, झाडूवाल्यांचे वाढतात. त्यांच्या कामांत काही वाढ झाली आहे? जो तो उठतो त्याचा डोळा शिक्षकांच्या पगारावर असतो. महाराष्ट्रातील शिक्षकांना जितका पगार मिळतो तितका कमी पगार भारतातील कुठल्याही इतर प्रांतात मिळत नाही. म्युनिसिपालिटीच्या झाडूवाल्यांना जितका पगार मिळतो त्याहून शिक्षकांचा पगार खूपच कमी असतो.
त्यांच्यापाशी मुलाना शिकवणे
या मुख्य कामासाठीच अल्प वेळ असतो.
खरी गोष्ट आहे. शिक्षकांना इतकी शिक्षणबाह्य कामे करावी लागतात, की त्यांना मुलांना पुरेसे शिकवायला वेळ मिळत नाही. पण याला कारण शिक्षक नाहीत, तर सरकारी धोरणे!
मुलांची संख्या जास्त. हे काळ काम
वेगाचे गणित इथे सतत चुकते.
वर्गांत जर सत्तरपेक्षा कमी मुले असतीत तर त्या मराठी शाळेला सरकारी मान्यता मिळत नाही. हा नियम उर्दू शाळांसाठी नाही. तिथे एखाद्या वर्गात एकही मुलगा नसेल तरी त्या वर्गासाठी शिक्षक असतात आणि शाळेला सरकारमान्यता असते.
मुले ज्या परीक्षा देतात त्या शिक्षकानीही
द्याव्यात विशेषतः १० वी १२वी .
परीक्षेत जास्त गुण मिळवणे आणि चांगले शिकवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याअर्थी शिक्षक शिकवू शकतो, त्याअर्थी त्याला विषयाचे ज्ञान आहे. नवीन अभ्यासक्रम अंमलात येण्यापूर्वी त्याचा उजळणी पाठ्यक्रम(रिफ़्रेशर कोर्स) शिक्षकांना करावाच लागतो.त्याशिवाय शैक्षणिक वर्षात एखाद्यातरी चर्चासत्राला हजेरी लावावी लागते.
चांगले शिक्षक तयार झाले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा
काळ सुखाचा होईल.
शिक्षकांची भरती जोपर्यंत सरकारी धोरणानुसार होते तोपर्यंत चांगले शिक्षक तयार होणे अवघड आहे.--अद्वैतुल्लाखान