अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
काल सकाळी थोडी उशीराच जाग आली. गेले तीन चार दिवस चाललेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे, सगळे रूटीन बिघडलेलेच होते. कधीही आणि काहीही जेवणे व खाणी, जागरणे ही चाललेलीच होती. त्यामुळे कदाचित असे झाले असावे नाहीतर अलीकडे पहाटे झोप ही उडतेच. डोळे उघडल्या बरोबर पलीकडच्या बाजूला नजर टाकली व गेल्या दीड दोन महिन्याच्या सवईप्रमाणे धाकट्या नातीला गाढ झोपलेली बघितली आणि एखादा काटा रुतावा तसे एकदम लक्षात आले की अरे उद्या आपल्याला ही अशी झोपलेली दिसणार नाहीये. तिची आई म्हणजे माझी मुलगी व या दोन्ही नाती आज संध्याकाळीच त्यांच्या घरी जायला निघणार ...
पुढे वाचा. : विस्कटलेला दिवस