माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

खेकडेगिरी झाली आता हा नेटोपास म्हणजे काय प्रकार आहे बुवा? तर संधी सोडवा हे जे काही शाळेत आपण करायचो त्याप्रमाणे नेट + उपास असं म्हणजे "नेटोपास" की नेटुपास??. जाऊदे साध्या सरळ सोप्या शब्दात एक दिवस नेट बंद. बंद म्हणजे संपुर्ण बंद. जे जे काही नेट वापरुन आपण करतो ते सर्व एका दिवसासाठी बंद. थोडक्यात मायाजालात एक दिवसासाठी गुरफ़टायचं नाही.
आता हा जो रविवार गेला त्यादिवशी मी खास हा एक दिवसाचा नेटोपास केला होता. कारण असं काहीच नाही. तसं बरीच वर्षे म्हणजे अमेरिकेत आल्यापासुनचा जवळजवळ सगळाच काळ आपण मायाजालात पुरते गुरफ़टलोय हे लक्षात आलं होतं पण ...
पुढे वाचा. : एक दिवस नेटोपासाचा....