पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या रोजच्या धावपळीत आणि गडबडीत आपण एखादी वस्तू किंवा आपल्याला हवी असलेली  कागदपत्रे आपण आठवणीने कुठेतरी ठेवून दिलेली असतात. पण जेव्हा ती आपल्याला हवी असतात, तेव्हा मात्र ती सापडत नाहीत. आपण अगदी हवालदील होऊन जातो. आपण आपल्यावरच रागावतो,  आपल्याच वेंधळपणावर मनातल्या मनात चरफडतोही. पण नेमके हवे त्या वेळी आपल्याला जे पाहिजे ते सापडत नाही.  यात कधी तासनतास जातात तर कधी एक-दोन दिवसही. आपल्याला काही केल्या आठवत नाही. मग घरातल्यांकडून आपल्यावर वेंधळा, विसराळू, धांदरट, महत्वाची अशी वस्तू कशी जागेवर ठेवता येत नाही, ठेवल्यानंतर ती कशी सापडत नाही, ...
पुढे वाचा. : हरवले ते गवसले का