भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
आता आम्हाला कारमपल्लीत काही महिने झाले होते. मुल मोठ्या प्रमाणात येऊ लागली, त्यांच्या सोबत त्यांचे पालकही येऊ लागले, आणि गावातिल लोकांशी आमची ओळख पाळखं वाढु लागली होती. कारमपल्लीची एक खासियत आहे. त्या गावात प्रत्येक माणसाच्या शेतात भाजीपाल्याची वाडी आहे. सरकार आज काल लोकाना विहीरी देत आहे पण कारमपल्लीचे शेतकरी मात्र केत्येक पिढ्यांपासुन शेतात विहिर खोदुन भाजीपाला पिकवित आहेत. त्या मानाने आमचं कुडकेल्ली मागासलेलं म्हणावं लागेल.