नुकतेच दा विंची कोड मराठीतून (अनुवादः अजित ठाकूर) वाचले. अप्रतिम आहे.

मूळ कथा आणि भाषांतर सुद्धा अगदी मस्त, अप्रतिम आहे.

अगदी शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी ही कथा आहे. आणी त्या अनुषंगाने येणारे विविध चिन्हे, प्रतिके आणि त्यावरून येणारे खुलासे हे ज्ञानात भरही टाकतात.

चित्रपट बघण्यापेक्षा मराठी अनुवाद वाचावा.

अगदी अधाशासारखी कादंबरी वाचून काढाल तुम्ही...!!!