Trekking, guitar, games and much more येथे हे वाचायला मिळाले:
इतर सर्व किल्ल्यांप्रमाणेच रतनगडचे नाव खूप ऐकुन होतो, अर्थात ते तेथिल पावसाळ्यात फ़ुलणाऱ्या फ़ुलांमुळेच. फ़ुले बघायला जाणे काही जमले नाही, परंतु गडावर जायचे नक्की होतेच. अशाच एका रविवारी नेहेमीप्रमाणे मी, नाशिक आणि अम्या कॅफ़े गूडलकमधे बन-ऑमलेट, बन-मस्का, चिज-ग्रिल्ड् ऑम्लेट आणि चहा पित टाइमपास करत बसलो होतो. तेव्हा अम्या किंवा नाशिकच्या डोक्यात रतनगडाचे वारे भिनले. आणि मग काय तिथे लगेच बसून प्लॅन नक्कि करण्यात आला. सोमवारी ऑफ़िसमधे आल्यावर नित्य-नेमाचे मेल आणि बग रिपोर्टस् बघून झाल्यावर ट्रेकचे मेल केले. नचिकेतला मुद्दामच लूपमधे ठेवला :) मग ...