जयश्री,

फुलणे नव्याने नको आणखी

उमलून मिटणे नको आणखी

सुंदर...!

गझल आवडली... ही गझल, विशेषतः मतला आणि पेटून विझणे इ. शेर वाचून संगीता जोशींच्या गझलांची आठवण झाली.

तुम्हीही ती नस सुंदररीतीनं पकडली आहे असं वाटलं. त्यामुळेच 'इष्कात' ऐवजी 'प्रेमात' यायला हवं होतं असं वाटलं. तसंच 'जगतोच आहे' ऐवजी 'जगतेच आहे'. (अर्थात हे मला वाचताना जास्त भावलेले बदल... तुमच्या मूळ गझलेत जे आहेत ते छानच आहेत.)

- कुमार