चर्चेच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, एच. पी च्या जालावरून तक्रार नोंदविल्यावर डिस्ट्रीब्युटरचा राग पाहिल्यावर एकंदरीत पुढे वाद घालण्यात शहाणपणा नाही हे घरच्यांनी समजावल्यावर व शांतपणे विचार केल्यावर जाणवले. खरं सांगायचं तर हा पुळचटपणा आहे हे कोणी सांगायला नको पण.... "बाबा रे ज्या राज्यात गुंडच पोलिसांना पोसतात, गुंड आणि नगरसेवक गळ्यात गळे घालून मस्तवालपणे फिरतात तिथे साधारणतः थोडी हुशारी वापरून आपले काम साधावे. निदान भारतात तरी हे असच का? हे का सहन करायचं? आपणच का सहन करायचं? वगैरे निरर्थक प्रश्नांनी आपले डोके (आणि कुटुंबाचे पण) शिणवू नये. भ्रष्ट पोलीस, नगरसेवक आणि गुंड यांच्यात कोण कोणाला कसे साथ देतात हे मी तुला सांगायला नको.