शेतकरी भाजीपाला लावताना प्रचलित भावाचा विचार करून निर्णय घेतो . कमी आवक असेल तर भाव कडाललेले असतात . त्यावेळी जास्त भाव बघून सर्वच शेतकरी अधिक प्रमाणात तो भाजीपाला लावतात . मग पीक अमाप येते --भाव पडतात --मधले दलाल अडते त्यांचे कुठलेही नुकसान पदरी न घेता शेतकऱ्याची अगदी कमी भावाची " पट्टी" फाडतात -- त्या भावाला परवडत नसेल तर शेतकरी भाजी परत नेण्याचा वाहतूक खर्च वाचवण्या साठी भाजीपाला मार्केट यार्ड मध्येच फेकून देतो
हे टाळण्या साठी शेतकरी आणि ग्राहक या मधले सगळे दलाल / अडते याना हाकलून द्या . शेतकरी आणि ग्राहक एकमेकांना भेटण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे
दुसरे असे की रिलायन्स / बिर्ला सारख्या मोठ्या धंदे करणाऱ्या व्यवस्थापनांनी शेतकऱ्यांना कमीत कमी आणि जास्तीत जास्त असे दोन भाव पूर्णं वर्षा साठी बांधून द्यावेत आणि तो माल बजारात आणावा
तिसरे असे की शेतकऱ्याच्या संघटना करून त्यांना भाजिपाल्या वर प्रक्रिया(फूड प्रोसेसिंग ) करून त्यांचा शेतीमाल योग्य दरात विकता येण्या साठी ट्रेनिंग द्यावे
आज मला दोन महिन्या पूर्वी पन्नास रुपयांना मिळणारी कोथिंबीर दोन रुपयांना मिळाली तेव्हा अगदी वाइट वाटले . त्या जुडी मध्ये मला गळफास लागलेला शेतकरी दिसत होता